ऊसदरासाठी शिवसेनेचे जय महेश कारखान्यावर आंदोलन

ऊसदरासाठी शिवसेनेचे जय महेश कारखान्यावर आंदोलन
ऊसदरासाठी शिवसेनेचे जय महेश कारखान्यावर आंदोलन

माजलगाव (जि. बीड): ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये देण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी शिवसेनेने आज (सोमवार) जय महेश कारखान्यावर आंदोलन करून उपाध्यक्षाला घेराव घातला. हे आंदोलन डॉ. उद्धव नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली झाले.

तालुक्यातील तिन्ही साखर कारखानदारांनी ऊसाचे दर जाहीर न करताच कारखाने सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे. यामुळे विविध संघटनेसह शिवसेनेने आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल 3 हजार रुपये प्रमाणे देण्यात यावी. २६५ जातीच्या ऊसाची नोंद घ्यावी, गाळपानंतर १५ दिवसांत ऊसाचे पैसे देण्यात यावेत या मागण्यासाठी शिवसेनेने आज (सोमवारी) जय महेश खाजगी साखर कारखाण्यासमोर आंदोलन करून कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना घेराव घातला.

दरम्यान, आठ दिवसापूर्वी सेनेने याच मागण्यासाठी सोळंके सहकारी साखर करखान्यावरही डफडे वाजवून आंदोलन केले होते. या आंदोलनात डॉ. उद्धव नाईकनवरे, पापा सोळंके, राज जाधव यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com