बीडः रस्ता खराब झाल्यामुळे बस बंद; विद्यार्थ्यांचे नुकसान (व्हिडिओ)

दयानंद माने
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

कडा (बीड) : रस्ता खराब झाल्यामुळे आष्टी मेहकरी ही सकाळी ७:३० वाजता येणारी बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत येणे बंद झाले असून, त्यांचे नुकसान होत आहे.

कडा (बीड) : रस्ता खराब झाल्यामुळे आष्टी मेहकरी ही सकाळी ७:३० वाजता येणारी बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत येणे बंद झाले असून, त्यांचे नुकसान होत आहे.

मेहकरी शिरापुर येथील ३० विद्यार्थी कडा येथील शाळा महाविद्यालयात दररोज आष्टी मेहकरी या बसने येतात. मेहकरी फाटा ते शिरापुर ४ कि.मी. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून, या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केलेले नाही अनेक वेळा शिरापूर येथील नागरीकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. परंतु, स्थानिक पुढा-यांनी याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले आता या  रस्त्याने साधे पायी चालने मुश्किल झाले आहे. या रस्त्यावरुन दररोज मेहकरी व शिरापूर येथील नागरीकांना कडा आष्टी येथे दैनंदिन कामासाठी जावे लागत असते. दररोज येणारी बस बंद करण्यात आल्याने नागरीकांनाही मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.

या रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडून खड्डयात पाणी साचल्याने वाहन चालकाच्या खड्डा लक्षात येत नाही. परिणामी खड्यात वाहनासह पडून अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. या रस्त्याची लवकर दुरूस्ती करुन बस पुर्ववत सुरु करावी, अशी मागणी शिरापूर येथील भरत देवकर, पोपट तागड, बंडू तागड, संतोष तागड आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. आष्टी तालुक्यातील बीड मेहकरी हि बस खेडेगावात जाणारी सर्वात पहिली बस होती. हि बस बंद झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: beed news st bus shut down due to bad road