तंबाखूमुक्त जिल्ह्यासाठी पथके नियुक्त करा

तंबाखूमुक्त जिल्ह्यासाठी पथके नियुक्त करा

बीड- संपूर्ण जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी तालुका व गावपातळीवर पथकांची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला यांनी गुरुवारी (ता. दोन) दिले.

तंबाखू नियंत्रण विषयीची जिल्हा समन्वय समितीची पाचवी बैठक सीईओंच्या दालनात पार पडली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एल. हरिदास, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. जी. दबडगावकर, क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. आंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची कडक अंमलबजावणी करून सर्व कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीचा संकल्प करण्यासंबंधीचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या जिल्हा समन्वय समितीमध्ये घेण्यात आला. तंबाखू नियंत्रणासाठी शिक्षण व पोलिस विभागाची मदत घेऊन भरारी पथके स्थापन करून विविध शाळा व कार्यालयांना भेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे.

बैठकीस या वेळी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. पवन राजपूत, सुरेश दामोदर, ऋषिकेश शेळके यांनी सहकार्य केले. बैठकीस विविध शासकीय कार्यालयाचे विभागप्रमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी, विक्रीकर अधिकारी, अन्न सुरक्षा अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होते.

साडेबारा हजार रुपये दंड वसूल
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व तंबाखू खाण्यास बंदी, सर्व शासकीय कार्यालय, रुग्णालय व शाळा परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्यांवर २०० रुपये दंड आकारणे सुरू केले आहे. अद्यापपर्यंत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांकडून १२ हजार ५०० रुपये एवढी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन जेथे होईल तेथे इतर विभागांनीही जिल्हा रुग्णालय प्रशासनाप्रमाणे दंड आकारण्यास सुरवात करण्यासंबंधीचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com