बीडः दुसर्‍यांदा शवविच्छेदनासाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

जगदीश बेदरे
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

गेवराई (जिल्हा बीड): शहरातील संजय नगर भागात नव विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेल्या विवाहितेचे दुसर्‍यांदा शवविच्छेदन करावे, या मागणीसाठी नातेवाईकांनी आज (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला आहे.

गेवराई (जिल्हा बीड): शहरातील संजय नगर भागात नव विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेल्या विवाहितेचे दुसर्‍यांदा शवविच्छेदन करावे, या मागणीसाठी नातेवाईकांनी आज (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला आहे.

तौरा सोहिल पठाण (वय २२) या विवाहितेने आत्महत्या केल्याचे मंगळवारी (ता. ५) सायंकाळी उघडकीस आले होते. दरम्यान, मुलीला पैशासाठी सासरच्यांनी जीवे मारल्याचा आरोप करत आरोपींना अटक करण्याची मागणी करत तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही.

आज (बुधवार) येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांवर आरोप करून बीड येथे दुसर्‍यांदा शवविच्छेदन करावे, अशी मागणी करत दुपारी तीन वाजता येथील पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. अद्यापही नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी

टॅग्स