अराजकीय व्यक्तींचा पर्याय बीडसाठी मान्य करू - मेटे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

राज्यातील 50 पालिका शिवसंग्राम लढविणार
बीड - जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांसह राज्यातील पन्नास नगरपालिकांच्या निवडणुका शिवसंग्राम लढविणार आहे. बीड नगरपालिकेच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागरांनी केवळ गैरव्यवहार केला आहे. क्षीरसागरांची सत्ता उलथून टाकण्यासाठी अराजकीय व्यक्तींनी काही पर्याय दिल्यास शिवसंग्राम स्वीकारेल, अशी भूमिका शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
 
येत्या बुधवारी (ता. 26) इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पक्षाचे सर्व उमेदवार ता. 28 व 29 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील. लोकसभा निवडणुकीपासून महायुतीसोबत असलो, तरी भाजपकडून अपमान आणि अन्याय होत असल्यामुळे भाजपबरोबर युती करण्याबाबत अनिश्‍चितता असल्याचे मेटे यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्याबाबतही समाजाच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे संभ्रम दूर करण्यासाठी रविवारी (ता. 23) पुणे येथे शिवसंग्राम आणि पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने राज्यव्यापी वकील परिषद घेणार आहे. पर्वती (पुणे) येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या परिषदेला मुंबई, दिल्ली, औरंगाबाद येथून 500 नामवंत वकील तसेच माजी न्यायमूर्ती सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.