बीडमध्ये पोलिसांचे "ऑल ऑऊट' ऑपरेशन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

बीड - बीड पोलिस दलाचे नूतन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारताच कारवाईला धडाक्‍यात सुरवात केली आहे. नागपूरच्या धर्तीवर बीड जिल्ह्यात मंगळवारी (ता.18) रात्री 11 ते बुधवारी (ता.18) पहाटे चार या कालावधीत "ऑल ऑऊट' ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये दीड हजार पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. याअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी कोंम्बिग ऑपरेशनही केले. 

"ऑल ऑऊट' ऑपरेशनअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास दीड हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी गणवेशामध्ये ठाण्याच्या हद्दीत उपस्थित होते. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे स्वतः या ऑपरेशनमध्ये पोलिसांसमवेत सहभागी झाले होते. या ऑपरेशनवर पोलिस अधीक्षक स्वतः नजर ठेवून असल्याने मंगळवारी मध्यरात्री जिकडे-तिकडे पोलिसच पोलिस रस्त्यावर दिसून येत होते. बीड शहरातील बार्शी नाका परिसर, जालना रोड, नगर रोड या मार्गावरून बीडकडे येणाऱ्या वाहनांची यावेळी तपासणी करण्यात आली. संशयित वाहनांची चौकशी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन केली. मोठ्या प्रमाणात पोलिस रस्त्यावर असल्याने काहीतरी मोठे प्रकरण झाले असल्याचा संशय नागरिकांना आला. बुधवारी पहाटे चार वाजेपर्यंत हे ऑपरेशन राबविले गेले. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑपरेशनमध्ये कामे नेमून दिली होती. या ऑपरेशनमध्ये पोलिस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक व दीड हजार पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. 

काही ठिकाणी कोंम्बिग ऑपरेशन 
"ऑल ऑऊट' ऑपरेशन अंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोंम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये किती ठिकाणी कारवाई केली गेली. याची माहिती बुधवारी दुपारपर्यंत घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या मोहिमेत रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्या भागात राहतात, त्याठिकाणची तपासणीही करण्यात आली. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे "ऑल ऑऊट' ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये कार्यालयातील तसेच ठाण्यातील पोलिसांनाही सामावून घेण्यात आले होते. ऑपरेशनचा आढावा घेण्यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी सायंकाळी झाली. 

मराठवाडा

औरंगाबाद - सरकारी निकष लावून गेलेली कर्जमाफी, पेरण्या करूनही पुन्हा पावसाने दगा दिल्याने पिके करपलेली, शेतमालास न परवडलेला...

09.45 AM

औरंगाबाद - शिक्षिकेच्या अवदानामुळे तिघांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळाली. डॉक्‍टरांनी केलेल्या समुपदेशनानंतर संबंधित...

09.45 AM

भूम - येथील नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय गाढवे यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, १४ नगरसेवक व तालुक्‍यातील...

09.36 AM