बीडमध्ये राष्ट्रवादीत "धस्स'! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

बीड - जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक काही तासांवर येऊन ठेपलेली असतानाच जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अंतर्गत बंडाळीमुळे एकवेळ सत्तेच्या जवळ वाटणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची केविलवाणी अवस्था झाली आहे. पक्षाचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला उघड मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. 

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता अंतर्गत बंडाळी माजली आहे. जिल्हा परिषदेच्या 60 पैकी सर्वाधिक 26 जागा पक्षाने जिंकल्या. तर 11 पैकी सात पंचायत समित्या पक्षाने ताब्यात घेतल्या. मात्र, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांना शह देण्यासाठी पक्षाचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला उघड मदतीचा निर्णय घेतला आहे. धस यांचे पाच समर्थक सदस्य असूनही इतरही काही सदस्य त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीत बंडाळी माजल्याने सोबत येण्याचा शब्द देणाऱ्या शिवसेना आणि कॉंग्रेसनेही राष्ट्रवादीला "हात' दाखवत भाजपशी जवळीक केली आहे. आमदार विनायक मेटे यांच्या भारतीय संग्राम परिषदेचे चार सदस्य पूर्वीपासून भाजपसोबत आहेत. त्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे येणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके यांची उमेदवारी निश्‍चित केली होती. तर भाजपमध्ये आता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या नावावर खल सुरू आहे. उपाध्यक्षपद शिवसेनेकडे जाईल, असा अंदाज आहे. भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांचा मताचा आकडा 35 च्या पुढे जाण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: beed zp election