अनुदान गैरव्यवहारातील अटकपूर्व जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

उस्मानाबाद - तुळजापूर यात्रा अनुदान गैरव्यवहार प्रकरणातील बारा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने शनिवारी फेटाळला. नगराध्यक्ष अर्चना गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे यांच्यासह बारा जणांनी जिल्हा न्यायालयात हा अर्ज दाखल केला होता.

तुळजाभवानी देवीच्या यात्रेसाठी सरकारकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते. या अनुदानामध्ये एक कोटी 62 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विद्यामान नगराध्यक्ष अर्चना विनोद गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे यांच्यासह 28 जणांच्या विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते; परंतु नगराध्यक्षा गंगणे यांच्यासह 12 जणांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. आज यावर सुनावणी झाली. न्यायालयाने संबंधितांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत.