जायकवाडीवरील पक्षी संवर्धनाकडे वन्यजीव विभागाचे दुर्लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

औरंगाबाद - जायकवाडी जलाशयावर सोमवारपासून (ता.26) वन विभाग, महसूल विभागाच्या वतीने पक्षी महोत्सव घेण्यात येत आहे; मात्र जायकवाडी जलाशयावर तीन ते चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहेत. वन्यजीव विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील पक्ष्याचे अस्तित्व धोक्‍यात येऊ लागले आहे. पक्ष्यांच्या संवर्धनाकडे महोत्सवातून तरी लक्ष वेधले जावे, अशी अपेक्षा पक्षी तज्ज्ञांतर्फे व्यक्‍त होत आहे. 

मराठवाड्यातील पक्षीप्रेमींसाठी हक्‍काचे स्थान म्हणून जायकवाडीकडे पाहण्यात येते. या जलाशयावर अडीशेहून अधिक विविध प्रकारचे पक्षी आढळतात. यात विदेशी पक्ष्यांची संख्या मोठी आहे. नोव्हेंबर ते जोनवारी या काळात विदेशी पाहुणे पक्षी या जलाशयावर येत असतात; मात्र गेल्या चार वर्षांपासून मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे जलाशयावरील पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. जायकवाडीच्या बॅकवाटरजवळ पक्ष्यांच्या खाद्य असलेल्या ठिकाणी वाढलले अतिक्रमणे, विनापरवानगी वाढलेली मासेमारी आणि इंधन मशीनचे वाढलेले ध्वनिप्रदूषण यामुळे पक्षी दुरावत चालले आहेत. या विषयी वन विभाग वन्य जीव विभागातर्फे कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. 

दोन कोटींचा निधी वापरलाच नाही 
जायकवाडी जलाशय परिसरातील ज्ञानेश्‍वर उद्यान परिसरातील दहा एकर क्षेत्रात जलाशयावर येणाऱ्या पक्ष्यांसाठी खाद्य आणि त्यांना राहण्यासाठी त्या प्रकारची झाडे असणे गरजेचे आहे. यासाठी दोन कोटी रुपये निधी वन्यजीव विभागाला देण्यात आला आहे. हा निधी देऊन चार वर्षे लोटली तरीही कोणतेच काम आतापर्यंत करण्यात आलेले नाही. हे काम प्रलंबित असताना वन्य जीव विभागातर्फे जानेवारीमध्ये खुल्या माहिती केंद्रासाठी सव्वादोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही कामे प्रलंबित ठेवून वन्यजीव विभाग केवळ पक्षी महोत्सव साजरा करून स्वतःची पाठ वनमंत्र्याकडून थोपटून घेत आहेत. 

""जायकवाडीवर पक्षी महोत्सव होत आहे; मात्र परिसरात वाढलेले अतिक्रमण कमी करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. केवळ लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. पक्षी संवर्धनासाठी महोत्सवासाठी मिळालेल्या निधीतून एक रुपयाही देण्यात आलेला नाही. महोत्सवातील अर्ध्याहून जास्त निधी पक्ष्यांसाठी वापरावा.'' 
-डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र 

Web Title: Bird conservation at the Wildlife Department to ignore Jayakwadi