भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा आज मेळावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

लातूर - लातूर महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची अर्ज स्वीकृती झालेली असून या इच्छुक उमेदवारांचा मेळावा गुरुवारी (ता. 30) कस्तुराई मंगल कार्यालय येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास पालकमंत्री सभाजी पाटील निलंगेकर इच्छुकांना मार्गदर्शन करणार असून जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी केले आहे. 

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झालेली आहे. जिल्ह्यातील भाजपच्या विजयाची घोडदौड या निवडणुकीतही सुरूच राहणार असल्याचा विश्‍वास असल्याने भाजपच्या वतीने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकृती पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे. गुरुवारी कस्तुराई मंगल कार्यालयात या इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुकांना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी खासदार सुनील गायकवाड, आमदार विनायक पाटील, आमदार सुधाकर भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार गोविंद केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास सर्व इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहर भाजपच्या वतीने करण्यात आलेले आहे.