भाजप सरकार संघटीत गुन्‍हेगारांची टोळी

मंगेश शेवाळकर
सोमवार, 16 एप्रिल 2018

हिंगोली - ''केंद्र व राज्‍य सरकार संघटीत गुन्‍हेगारांची टोळी असून, शेतीमालाला कमी भाव देवून उद्योगपतींना जास्‍त पैसे मिळवून देण्याचा उद्योग त्‍यांच्‍याकडून केला जात आहे''. उद्योगपतीच्‍या नफ्यातून मोठा हिस्सा राज्‍याला मिळत असल्‍याचा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी केला. येथील शासकीय विश्रामगृहात शहिद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्‍या निमित्ताने पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्‍हणाले की, बाजारातून सोळा रुपये किलो गहू खरेदी करून चाळीस रुपये किलोप्रमाणे आटा विकणाऱ्या उद्योगपतींना मोठा फायदा होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्‍या गव्‍हाला चांगला भाव मिळत नाही ही शोकांतिका आहे. उद्योगपतींसाठी नऊ लाख कोटी रुपये एनपीए देवू शकतात तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ का करू शकत नाहीत असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला. उत्‍पन्न वाढवण्याचे अभियान नको तर शेती वाढवण्याचे अभियान पाहिजे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांची कार्यपद्धती बदलली पाहिजे अन्यथा भविष्यात भाजपचा बिमोड होईल असे त्‍यांनी सांगितले. 

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार खरोखरच शेतकरी असतील तर त्‍यांना शेतीतून कशाप्रकारे उत्‍पन्न मिळते हे सांगावे, त्‍या पद्धतीनेच आम्‍ही शेती करू असे त्‍यांनी सांगितले. १४ मे रोजी राज्‍यभरात एकाचवेळी सुमारे चाळीसपेक्षा अधिक संघटना रस्‍त्‍यावर येणार असून, या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

Web Title: BJP government raghunathdada patil