किल्लेधारूरमध्ये स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

किल्लेधारूर - येथील नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीसाठी सोमवारी (ता.23) बैठक झाली. यात तीन विषय समित्यांवर भाजप; तर एका समितीवर जनविकास आघाडीच्या नगरसेवकांची निवड झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मनीषा तेलभाते होत्या. पीठासीन अधिकारी म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित होते.

किल्लेधारूर - येथील नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीसाठी सोमवारी (ता.23) बैठक झाली. यात तीन विषय समित्यांवर भाजप; तर एका समितीवर जनविकास आघाडीच्या नगरसेवकांची निवड झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मनीषा तेलभाते होत्या. पीठासीन अधिकारी म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित होते.

यात स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष स्वरुपसिंह हजारी (भाजप); तर उपनगराध्यक्ष मीनाक्षी गायकवाड (भाजप) यांची पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी पदसिद्ध म्हणून निवड झाली. बांधकाम सभापतीपदी ज्योती सिरसाट (भाजप), महिला व बालकल्याण सभापतीपदी रंजना चव्हाण (भाजप), दिवाबत्ती व स्वच्छता समितीच्या सभपतीपदी राजश्री खामकर (जनविकास आघाडी) यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सदस्यपदी नगरसेवक रुपेश रामचंद्र चिद्रवार (भाजप) यांची बिनविरोध निवड झाली. यात सदस्य म्हणून भाजपचे तीन आणि जनविकास आघाडीचे एक असे एकूण चार सदस्य निवडण्यात आले. शिवाय नगरपालिका संख्या बळानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन नगरसेवकही सदस्य म्हणून निवडण्यात आले.

निवड पद्धतीवर राष्ट्रवादीचा आक्षेप

पालिकेच्या विविध विषय समित्यांचे सदस्य निवडण्यापूर्वीच प्रशासनाने सभापतीपदाचे नामनिर्देशनपत्रे भरून घेतले. त्यामुळे ही प्रक्रियाच चुकीची असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला. सदस्यांच्या म्हणण्याप्रमाणे विषय समितीच्या निवडीसाठी सोमवारी (ता.23) दुपारी 12 वाजता सभा बोलवण्यात आली. या वेळी नगरपालिका सदस्यांना सकाळी दहा ते बारापर्यंत सभापतीपदासाठी नामनिर्देशनपत्रे भरण्याची सूचना देण्यात आली होती. नगरसेवकांना देण्यात आलेली सूचना, शासनाचे नियम व प्रत्यक्ष घेण्यात आलेली प्रक्रिया यात तफावत आहे. विषय समितीच्या सदस्यांच्या निवडीच नसताना सभापतीपदासाठी अर्ज कसा करावा, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे ही विषय समिती गठीत करण्याची प्रक्रिया रद्द करून फेरनिवडी कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या उज्ज्वला शिनगारे, स्वीकृत सदस्य माधव निर्मळ, दत्तात्रय सोनटक्के, संजित कोमटवार, सातीदंर गोन्ने, मोमीन उमेसलमाबी, सुरवंताबाई शेळके यांनी केली आहे.

मराठवाडा

नांदेड : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता.१९) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले. तसेच...

07.00 PM

माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरिल श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे श्रावणमास...

03.51 PM

पूर्णा : तालुक्यात दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर वरूनराजाचे दमदार आगमन झाले आहे. अतीवृष्टीने तालुक्यातील धानोरा काळे येथील...

03.24 PM