कालव्यात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह तेरा तासांनी सापडला

अशोक कोळी
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

धानोरा (अंबाजोगाई) - मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यात वाहून गेलेल्या १२ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह तेरा तासांनी शुक्रवारी (ता. २०) आढळून आला. सुप्रिया गायसमुद्रे (रा. धानोरा, ता. अंबाजोगाई) असे या मुलीचे नाव आहे. 

आजोबांसोबत सरपण आणण्यासाठी सुप्रिया गुरुवारी (ता. १९) शेतात गेली होती. आजोबा सरपण काढत असताना सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सुप्रिया कालव्यात पडली. काही वेळांनी सुप्रिया दिसत नसल्याने तिची शोधाशोध केली. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेतला मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे तिचा मृतदेह सापडला नाही. अखेर कालव्याचे पाणी बंद केल्यानंतर शुक्रवारी सकाळी सहा वाजता तिचा मृतदेह आढळून आला. युसूफवडगाव (ता. केज) पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

Web Title: The body of the girl who was carried away in the canal was found