लातुरात बोगस डॉक्‍टरला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

लातूर - डॉक्‍टर नसताना येथील एका महिलेवर कर्करोगाचा उपचार करून साडेचार लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका बोगस डॉक्‍टरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, गुरुवारपर्यंत (ता.30) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी दिली. 

येथील मित्रनगर भागातील पुष्पा रमेश शेट्टी (वय 60) ही महिला आजारी होती. या महिलेला कर्करोग आहे. विवेकानंद रुग्णालयातील डॉक्‍टरने डोस देण्यासाठी पाठविले आहे, अशी खोटी माहिती सांगून बालाजी मानकोसकर याने शेट्टी कुटुंबीयाला विश्वासात घेऊन कर्करोगाचे उपचार सुरू केले. स्वतः डॉक्‍टर नसताना कर्करोगावरील औषधाचे चुकीचे डोस दिले. एप्रिल 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत हे औषधोपचार सुरू होते. यात त्याने दर महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये शेट्टी कुटुंबीयांकडून घेतले. 

साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद या महिलेचा मुलगा प्रवीण शेट्टी यांनी दिल्यावरून मानकोसकर याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.