बोलेरो गाडी झाडावर आदळून तीन भाविक ठार, अठरा जखमी

accident
accident

माहूर : तेलंगणा राज्यातील पटनापूर येथे श्री फुलाजीबाबा यांच्या दर्शनाकरिता जात असलेल्या बोलेरो गाडीला भीषण अपघात होऊन दोन महिला व एका पुरुषासह तीन भाविक ठार झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (ता.26) पहाटे तीन वाजता माहूर तालुक्यातील गोंडवडसा गावाजवळ घडला. मृत व जखमी भाविक हे यवतमाळ जिल्ह्यातील धनज तालुका उमरखेड येथील आहेत .    

माहूर येथून वीस किमी अंतरावर असलेल्या गोंडवडसा गावाजवळ गुरुवारी (ता.26) पहाटे तिन वाजता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून भिषण अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनात चालकासह एकविस भाविक होते. घटनास्थळी रुखमाबाई केशव वंजारे (वय -65), निर्मलाबाई दुलाजी बोबंले (वय-45) या दोन महिला भाविकांचा मृत्यु झाला. जखमी भाविकांना तातडीने माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यात आले.

शासकिय ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक डॉ. व्हि.एन. भोसले, डॉ.व्हि.पी. मोरे, सुंदर बोथींगे, पि.आर. जुडे,मुदाळे, अमृता कऱ्हाळे यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेल्या गयाबाई सोनबा वाळके (वय 55), चालक दिपक शेळके (वय 27), डुलाजी कोंडीबा बोबडे (वय 55), श्रावण बंसता मिराशे (वय 35), तुळसाबाई बळीराम बोंबले (वय 65), लिबुंबाई भिवाजी गुव्हाडे (वय 65), बाळु श्रीराम गुव्हाडे (वय 35), रेणूका झानेश्वर साबळे (वय 35), श्रीराम सखाराम गुव्हाडे (वय 49) यांना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. यवतमाळ येथे बाळु श्रीराम साबळे याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

इतर जखमी भाविक शकुंतला गुव्हाडे (वय 50), शारदा गायकवाड (वय 15), उषा गायकवाड (वय 30), बारकुबाई बरगे (वय 70), प्रतिक्षा इंगळे (वय 16), बाबुराव गायकवाड (वय 36), सुमन मिराशे (वय 65), प्रिमीलाबाई वाळवटे (वय 70), अनुसया भालके (वय 60), धुरपताबाई गावडे (वय 60), सर्व (रा. धनज ता. उमरखेड जि. यवतमाळ) यांच्यावर माहूर येथे उपचार करण्यात येत आहेत.         ़

अपघाताची माहीती मिळाल्यानंतर आमदार प्रदिप नाईक, तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर, पोलीस निरिक्षक लक्ष्मण राख यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देवून जखमी भाविकांची विचारपूस करून माहीती घेतली. पोलीस उपनिरिक्षक शरद घोडके, पोलीस कर्मचारी श्री बट्टेवाड यांनी भाविक व नातेवाईक यांच्याकडून माहीती घेतली. सदरिल भिषण अपघातामुळे धनज गावावर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com