औरंगाबाद बाजार समितीत संपावरुन मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

शेतकरी संपावर असल्याने औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत संपात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी गेलेले अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सुर्यवंशीसह पाच जणांना फळभाजीपाला मार्केटमधील व्यापारी, विक्रेत्यांनी मारहाण केली.

औरंगाबाद- शेतकरी संपावर असल्याने औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत संपात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी गेलेले अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सुर्यवंशीसह पाच जणांना फळभाजीपाला मार्केटमधील व्यापारी, विक्रेत्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर एका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला शासकीय रुग्णालय (घाटीत) उपचारासाठी) नेण्यात आले. थोडासा भाजीपाला, फळ फेकण्यात आल्याने येथील अनेक व्यापारी संतप्त झाल्याने त्यांनी ही मारहाण केली. यानंतर औरंगाबाद बाजार समितीत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

शेतकरी संपात सहभागी व्हावी कुणी ही भाजीपाला आणू नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते जयाजीराव सुर्यवंशी आणि कार्यकर्त्यांनी शेतकरी व्यापाऱ्यांना केले. यानंतर फळभाजीपाला मार्केटमध्ये आल्यावर येथे काही प्रमाणात भाजी, टरबुज फेकण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले. 30 ते 40 व्यापारी, विक्रेत एकत्र आले त्यांनी जयाजीराव सुर्यवंशीसह पाच कार्यकर्त्यांना झोडपुन काढले. यामध्ये जखमी झालेले गजानन देशमुख यांना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी नेले. सध्या बाजार समितीत व्यवहार सुरळीत असून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.