अंगावरची हळद निघण्यापूर्वीच तीने संपवली जीवनयात्रा

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 23 मे 2017

नांदेड: सासरी करमत नसल्याने एका नववधुने माहेरी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या 18व्या दिवशी घडलेल्या या घटनेने दोन्ही परिवार सुन्न झाले. ही घटना नेरली (ता. नांदेड) येथे सोमवार (ता. 22) रात्री घडली. अंगावरची हळद निघण्यापूर्वीच नववधुनी केलेली आत्महत्या परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली.

नांदेड: सासरी करमत नसल्याने एका नववधुने माहेरी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या 18व्या दिवशी घडलेल्या या घटनेने दोन्ही परिवार सुन्न झाले. ही घटना नेरली (ता. नांदेड) येथे सोमवार (ता. 22) रात्री घडली. अंगावरची हळद निघण्यापूर्वीच नववधुनी केलेली आत्महत्या परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली.

मुदखेड तालुक्यातील जवळा पाठक येथील सचीन जाधव यांच्यासोबत नांदेड तालुक्यातील नेरली येथील मिरा (वय 20) हिचा विवाह 4 मे रोजी झाला. मिराच्या वडिलांनी आपल्या मुलीचा थाटामाटात विवाह लावून दिला. त्यासाठी त्याने कठीम परिश्रम घेतले. परंतु, मुलीच्या नशिबी स्थळ चांगले राहावे म्हणून त्यांनी लग्नात वरपक्षाची सरबराई करण्यात कुठेच कसर ठेवली नाही. विवाहानंतर ती नांदावयास जवळा पाठक येथे गेली. पंधरा दिवस तिने कसाबसा संसार केला. परंतु तिचे मन संसारात व सासरी रमले नाही.

तिला सासरी करमत नसल्याने 18 मे रोजी ती आपल्या माहेरी नेरली येथे आली. मला सासरी करमत नाही असे तिने आपल्या पालकांना सांगितले. तिला पालकांनी समजावून सांगीतले की नवीन स्थळ असल्याने थोडे दिवस करमणार नाही. परंतु हे तिला मान्य नव्हते. अखेर तिने आपल्या माहेरी सोमवारी रात्री सर्व झोपेत असतांना पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वामन राघोजी रासे यांच्या माहितीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस जमादार एम. आर. माळगे हे करीत आहेत.

मराठवाडा

नांदेड : जगातील सर्व भाषांमधून, त्यातील साहित्यांमधून आईचे महात्म्य आणि महत्त्व अगदी मोठमोठ्या लोकांनी मुक्त-कंठाने व्यक्त केलेले...

01.12 PM

औरंगाबाद - शहरात अंत्यविधीसाठी स्वर्गरथ, मोक्षरथ, वैकुंठरथ असतात; मात्र खेड्यांत असा कोणताही रथ नसतो. गावात मृतदेह खांद्यावर घेऊन...

10.33 AM

औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मेंटॉर म्हणून आता उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवार यांची राज्य शासनाने नियुक्‍ती केली...

10.33 AM