फ्लिपकार्टवरून शस्त्रांची खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

औरंगाबाद - फ्लिपकार्ट, को-मार्केटिंग कुरिअर इन्स्टाकार्ट पार्सलद्वारे मुंबईतील भिवंडीहून घातक शस्त्रांची ऑनलाइन खरेदी झाल्याचा प्रकार उघड झाला. यात सहा खरेदीदारांसह कुरिअरच्या व्यवस्थापकाला गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. 28) रात्री साडेआठच्या सुमारास जयभवानीनगर व नागेश्‍वरवाडी येथे करण्यात आली. 

कुरिअरचा व्यवस्थापक स्वप्नील दहिवालकर, विकास महादू दळवे (रा. विजयनगर, नक्षत्रवाडी), जुबेर दिलावर शहा (रा. पोटुळ, ता. गंगापूर) यांना अटक झाली. त्यांना न्यायालयाने चार जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सागर बन्सीलाल पाडसवान (रा. न्यू हनुमाननगर), नवीद खान उबेद खान (रा. उस्मानपुरा), चंदन अनंत लाखोलकर (रा. न्यू एसटी कॉलनी, एन-2, सिडको), मुकेश भगवान पाचवणे (रा. लहुजीनगर, हर्सूल) यांना न्यायालयाने 31 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

घरपोच सेवेचा असाही गैरवापर 
शस्त्रे मागविताना तरुणांनी त्यांचा मोबाईल क्रमांक न देता घराचा पत्ता दिला. त्यामुळे कुरिअरद्वारे आलेली शस्त्रे कोणत्याही व्यक्तीने नाव सांगून पार्सल घेणे सहज सोपे होते. तसेच, शस्त्रांचे पार्सल घरपोच आल्यानंतरच पैसे दिले जात असल्याने फ्लिपकार्टद्वारे खरेदीदारांना शस्त्रे सहज उपलब्ध होत आहेत. 

Web Title: Buying arms from Flipkart