तर्री नको.. तिखट कमी टाका!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईहून येणाऱ्या मंत्र्यांसह सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नाश्‍ता, जेवणासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. भाज्यांमध्ये तर्री नको, तिखट कमी राहील, जेवणानंतर पोट खराब होणार नाही, याची काळजी घ्या. बिले निघायला अडचण येईल, असे काही होणार नाही, याची दक्षता बाळगा, अशा सक्त सूचना नाश्‍ता-जेवणाची जबाबदारी दिलेल्या केटरर्सना देण्यात आल्या आहेत.

विभागीय आयुक्‍तालयाच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांसह २३ कॅबिनेटमंत्री, मुख्य सचिव, सचिव, प्रधान सचिव आदी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या सुरवातीला चहा-कॉफी विथ कुकीज आणि ढोकळा देण्यात येईल. तर दुपारी मिंट आलूवडा विथ चटणी, व्हेजिटेबल कट्टी रोल, मूगडाळीचा हलवा वाढण्यात येईल. हे पदार्थ हॉटेल ताजमधून मागविण्यात आले आहेत. तर सचिव, प्रधान सचिव व इतर अधिकाऱ्यांसाठीही प्युअर व्हेजचे जेवण राहणार आहेत. सुभेदारीवर मुक्कामी राहणाऱ्या अधिकाऱ्यांना सोमवारी (ता. तीन) रात्री पनीर जहांगीर व मिक्‍स व्हेज अशा दोन भाज्या, दाल तडका व राईस, लोणचे-पापड, सलाडची चव घेता येईल. तर स्वीट डिशमध्ये खास शेवयांची खीर चाखता येईल. 

मंगळवारी (ता. चार) सकाळी नाश्‍त्यामध्ये इडली-वडा सांबर, चटणी, पोहे, शिरा आणि चहा-कॉफी देण्यात येईल. बैठकीच्या वेळी दुपारच्या जेवणात पनीर मसाला, मिक्‍स व्हेज, चपाती, दाल-राईस आणि गुलाबजामून असा मेन्यू राहील. जेवणाबाबत किंवा जेवणानंतर काही तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्या. जेवणाची क्वॉलिटी बेस्ट ठेवा... अशा सूचना केटरर्सना वारंवार देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: cabinet meeting in aurangabad