महिलांनो कर्करोग समजुन घ्या! 

cancer
cancer

औरंगाबाद : निरोगी आणि सुखी जीवनातही स्वतःची काळजी घेतली पाहीजे. समतोल पोषक आहार आणि योग्य व्यायाममुळे निरोगी आयुष्य जगणे शक्‍य आहे. नैसर्गिक कारणांनी होणारा कर्करोग थांबवणे आपल्या हातात नसले तरी कर्करोग होऊ नये म्हणुन काळजी घेणे गरजेची आहे. त्यासाठी कर्करोग महिलांनी समजुन घेतला पाहीजे. लवकर निदान व वेळीच उपचार घेतल्यास कर्करोगापासुन मुक्ती शक्‍य असल्याचे मत टाटा कर्करोग रुग्णालयाच्या कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अमिता माहेश्‍वरी यांनी मांडले. 

फाईट अगेंस्ट कॅन्सर या उपक्रमाअंतर्गत मायनॉरीटी फ्रंट आणि टाटा कर्करोग रुग्णालयाच्या वतीने एमजीएमच्या द्योतन सभागृहात शुक्रवारी (ता. 13) पार पडलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. राजेंद्र बोरा, डॉ. प्रविण सुर्यवंशी, डॉ. राजेंद्र प्रसाद जैस्वाल, एस ए जाफरी, गौरी रावेरकर, डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. डॉ जावेद खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्थाविक केले. 

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग 
देशातील दुसरा सर्वात मोठा कर्करोगावर उपाय शक्‍य झाले. ग्रामीण भागात एक चतुर्थअंश स्त्रीयांना हा कर्करोग आढळत असुन तर दर आठ मिनिटाला एक महिलेचा मृत्यू होतो. कमी वयात शाररिक संबंध,जास्तवेळ गर्भधारना, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन, पोषक आहाराची कमतरतेमुळे व ह्युमन पॅप्लीओमा व्हायरसच्या (एचपीव्ही) इन्फेक्‍शनमुळे हा कर्करोग जडतो. यासाठी एचपीव्ही व्हॅक्‍सीन 9 ते 13 वयाच्या दरम्यान लहान मुलींसाठी उपलब्ध आहे. ती 26 वर्षापर्यंत घेता येते. मात्र ती सत्तर टक्केच प्रभावी असल्याचे सिद्ध झाले असल्याचे डॉ. माहेश्‍वरी म्हणाल्या. 

गर्भपिशवी व अंडकोशाचा कर्करोग 
गर्भपिशवि तसेच अंडकोशाच्या कर्करोगावरील उपचार व शस्त्रक्रीयेची माहीती देतांना त्यांना किमो थेरपीला घाबरुन चालणार नसल्याचे सांगितले. तसचे वयाच्या पंचविशीनंतर दर तीन वर्षांना पॅपस्मेअरची चाचणी गरजेची आहे. 

शहरी लाईफस्टाईल जबाबदार 
महिलांच्या शरिरातील सर्वप्रकारच्या आढळणाऱ्या गाठी कॅन्सरच्या नसतात. मात्र त्या गाठींकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे सांगत. या गाठींची मेमोग्रॅफी करुन घेण्याचा सल्लाही त्यांनी महिलांना दिला. स्तनाचा कर्करोगाला शहरातील व्यस्त व बैठे जीवनपद्धती वपॅकेज, जंक व फास्ट फुडच्या आहार जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या. शाररीक श्रम, हिरव्या पालेभाज्या, ताजे अन्नपदार्थ, फळांचे सेवन आहारात गरजेचे असुन स्वच्छतेवर लक्ष देण्याचा सल्ला डॉ. माहेश्‍वरी यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com