वीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता. तीन) जवळपास 87.26 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 93.69 टक्के मतदान हिंगोलीत, तर सर्वांत कमी मतदान 75.68 टक्के मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले. एकूण 58 हजार 410 मतदारांपैकी 50 हजार 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

औरंगाबाद - मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता. तीन) जवळपास 87.26 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 93.69 टक्के मतदान हिंगोलीत, तर सर्वांत कमी मतदान 75.68 टक्के मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले. एकूण 58 हजार 410 मतदारांपैकी 50 हजार 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

आता प्रमुख राजकीय पक्षांसह विविध शिक्षक संघटनांच्या 20 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी (ता. सहा) मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून मराठवाड्यातील 275 मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाचा जोश दिसून येत होता. पसंती क्रमानुसार मतदान असल्याने शिक्षकांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी 27 टक्के मतदान झाले होते. दुपारी दोनपर्यंत सरासरी 56 टक्के मतदान झाले. त्यानंतरही मतदारांचा ओघ सुरूच होता. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे विक्रम काळे, शिक्षक परिषदेचे भाजप पुरस्कृत सतीश पत्की, शिवसेनेचे प्रा. गोविंद काळे, मराठवाडा शिक्षक संघाचे व्ही. जी. पवार, शिक्षक बचाव समितीचे युनूस पटेल, संग्राम मोरे यांच्यासह वीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

मतदान केंद्राबाहेर कार्यकर्ते, शिक्षकांचे टेबल
प्रत्येक मतदान केंद्राबाहेर प्रमुख राजकीय पक्षांसह शिक्षक संघटनांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी यांनी टेबल लावले होते. प्रत्येकाकडे उमेदवारांच्या नावांची यादी होती. तर काहींनी ही यादी लॅपटॉपमध्ये ठेवली होती. जास्तीत शिक्षक मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत आणण्यासाठी या प्रतिनिधींकडून प्रयत्न केला जात होता. याच केंद्राबाहेर प्रमुख पक्षातील आमदार, पदाधिकारी, नेते यांनीसुद्धा भेटी दिल्या.

गाड्या, नाश्‍ता, जेवणाची व्यवस्था
शिक्षक मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी स्वतंत्र गाड्या करण्यात आल्या होत्या; तसेच केंद्राबाहेर असणाऱ्या कार्यकर्ते, प्रतिनिधी यांच्यासाठी सकाळी नाश्‍ता, दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासून मंडप टाकून अनेक कार्यकर्ते चार वाजेपर्यंत केंद्राबाहेर बसले होते.

मतमोजणीसाठी 56 टेबल
मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (ता. सहा) फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. कलाग्रामसमोरील मराठवाडा रियल इंडस्ट्रीज ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात होईल. त्यासाठी 56 टेबल लावण्यात आलेले आहेत. गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर 1 हजार मतदान मोजले जाणार असून, वैध मतदानावर मतांचा कोटा ठरविण्यात येणार आहे.

मराठवाड्यात झालेले मतदान
जिल्हे................एकूण झालेले मतदान...........मतदानाची टक्केवारी
औरंगाबाद................8659.........................75.68
जालना....................3989..........................85.49
परभणी....................4073.........................90.27
हिंगोली.....................2496.........................93.69
नांदेड.......................7980.........................88.23
बीड.........................9265.........................89.13
लातूर........................9410.........................92.35
उस्मानाबाद..................5096.........................92.71
एकूण.......................50968........................87.26

मराठवाडा

औरंगाबाद - एसटी महामंडळातील कामगार कराराचा प्रश्‍न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सातवा...

01.30 AM

सेलू (परभणी): तालुक्यात विविध ठिकाणी पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणा-या सर्जा-राजाला (...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : जायकवाडी धरणात काल रविवार (ता.20) पासून वरच्या धरणातून पाण्याचा ओघ सुरु झाला आहे. सोमवारी (ता.21) दुपारपर्यंत 56....

सोमवार, 21 ऑगस्ट 2017