माजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

In the case of former Sarpanchs murder two people have been given ten years rigorous imprisonment
In the case of former Sarpanchs murder two people have been given ten years rigorous imprisonment

लातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खुन केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षांच्या सक्तमजुरीची आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. दत्ता विश्वनाथ लांडगे, नागनाथ बाबुराव इगे (दोघेही रा. रेणापूर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

रेणापूर तालुक्यातील खानापूर भागात सह्याद्री नावाचा ढाबा आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सतीश हणमंत जाधव आणि धनेश्वर मोहन शिंदे (रा. पळशी) हे ढाब्याच्या आडोश्याला थांबले. काही वेळाने पाऊस थांबला म्हणून ते दुचाकीवरून पुढे निघणार होते. तेवढ्यात तेथे 'या ढाब्यावर दारू मिळते का' अषी विचारणा आरोपींनी जाधव यांच्याकडे केली. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची आणि धक्काबुक्कीही झाली. इगे याने जाधव यांचे हात पकडून ठेवले तर लांडगे याने मोठा दगड उचलून जाधव यांच्या डोक्यात घातला. त्यामुळे डोक्यातून रक्त वाहू लागले. 19 ऑगस्ट 2015 मध्ये ही घटना घडली होती.

मारहाणीनंतर शिंदे यांनी तातडीने जाधव यांना सुरवातीला रेणापूरमधील, त्यानंतर लातूर आणि औरंगाबादमधील खासगी दवाखान्यात दाखल केले. पण काही तासांनी जाधव यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती देत शिंदे यांनी रेणापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिस अधिकारी विशाल वाघमारे यांनी तपास पूर्ण करून लांडगे आणि इगे यांच्याविरोधात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधिक (क्रमांक २) ए. एन. पाटील यांच्यासमोर झाली. न्यायालाने दोन्ही आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरीची आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा दिली जाणार आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे संतोष वसंतराव देशपांडे यांनी काम पाहीले. त्यांना पोलिस हवालदार आर. टी. राठोड, दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com