मानवत उपनगराध्यक्षाच्या पतीची शिवीगाळ; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

मानवत : शहरातील उपनगराध्यक्षाच्या पतीने कॉंग्रेसच्या माजी जिल्हाअध्यक्षाला शिवीगाळ केल्याप्रकरणी  त्यांच्यावर मानवत पोलिस स्टेशनला मंगळवारी (ता.२४) रात्री उशीरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यासंदर्भात  मानवत पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला की, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक मंगळवारी( ता. २४) यांच्या राहत्या घरी सायंकाळी ७ च्या दरम्यान कार्यालयात बसले असताना डॉ. अंकुश लाड हे मद्यधुंद अवस्थेत तेथे आले. व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरु केली.

आम्ही नगर अध्यक्षाचे जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातुन घेऊन आलो आहोत. तुमच्याने आमचे काहीही वाकडे झालेले नाही. तुमचे बघून घेऊ. तुम्ही सतत आमच्याविरोधातील तक्रारदाराला मदत केलीत. आता यापुढे तुमचे व्यक्तिगत पातळीवर बघून घेऊ असे धमकावले. 

तसेच शहरात अन्य एका ठिकाणी अशाच प्रकारे धिंगाणा घातल्याची चर्चा होती.
या प्रकाराने चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Case registered against Dy Mayor in Manvat

टॅग्स