आधी खाते उघडून दिले नंतर पैसे काढत राहिला!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

औरंगाबाद - बॅंकेत मुलगा व आईच्या नावाने खाते उघडून दिले, त्यानंतर एटीएम, पासबूक आपल्याकडेच ठेवून परस्पर एक लाख वीस हजार रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणात एकाविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. आठ) गुन्ह्याची नोंद झाली.

गुरलालसिंग चरणसिंग सिंधू (रा. पुंडलिकनगर) याने राणी मलिक गरनायब बंत (वय 40, रा. उस्मानपुरा) यांचे व त्यांच्या मुलाचे दोन डिसेंबर 2015 ला बॅंकेत खाते उघडून दिले. एटीएम घेतेवेळी त्याने बंत यांच्याऐवजी स्वत:चा मोबाईल क्रमांक बॅंकेत नोंद केला. त्यानंतर बंत यांना विश्‍वासात घेऊन त्यांचे पासबुक व एटीएम कार्ड त्याने स्वत:कडेच ठेवले. बंत यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात एक लाख 53 हजार रुपये भरले होते. पण बंत यांच्या परस्पर त्याने एटीएमद्वारे वारंवार पैसे काढले. याबाबतचा संदेशही सिंधू याच्याच मोबाईलवर येत असल्याने बॅंक व्यवहार व रकमेबाबत बंत यांना कोणतीही माहिती समजली नाही.

याउलट सिंधू याने खात्यातून पैसे निघत नसल्याची बंत यांना थाप मारली. बंत यांनी बॅंकेत चौकशी केली असता, सिंधूने परस्पर एक लाख वीस हजार रुपये लांबवल्याचे समोर आले. बंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: cheating in aurangabad