महिला उपशिक्षणाधिकाऱ्यासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

Crime
Crime

औरंगाबाद - प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी अश्‍विनी अनिल लाठकर आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव भावराव कळम यांच्याविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात बनावट कागदपत्रे तयार करून प्रशासनाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांच्या आदेशाने शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी (ता. सात) गुन्हा दाखल करण्यात आला. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद रिक्‍त असल्याने ६ नोव्हेंबर २०१७ रोजी महिला उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे अतिरिक्‍त पदभार सोपवण्यात आला होता. दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी त्यांनी माध्यमिक स्तराच्या ११ विशेष शिक्षकांना पुन:स्थापना दिली होती. स्थायी सभेत यावरून जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची शिक्षण संचालकांनीही दखल घेतली होती. अखेर कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. कळम यांच्यासह उपशिक्षणाधिकाऱ्यांनी संगमताने हा प्रकार करून शासनाची व जिल्हा परिषदेची फसवणूक केली. तसेच जिल्हा परिषदेच्या अभिलेखाची कागदपत्रे गहाळ करून त्यांनी केलेल्या गैरकृत्याचा पुरावा नष्ट केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पुढील तपास उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव करीत आहेत.

दीडशे ई-मेल्स, कागदपत्रेही गहाळ
तत्कालीन महिला शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी कळम यांनी कार्यालयीन संचिकेतील १ ते १९९ पानांपैकी ४७, ४९, ५१, ५३ आणि ५४ क्रमांकाची पाने स्वतःचा गैरप्रकार लपवण्यासाठी गहाळ केली. तसेच कार्यालयाच्या अधिकृत शासकीय ई-मेल आयडीवरील ६ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंतचे सेंट बॉक्‍समधील स्वतः केलेल्या मेल्ससह पोषण आहाराच्या आरटीजीएसद्वारे जमा होणाऱ्या रकमेचे आणि इतर असे दीडशेपेक्षा जास्त ई-मेल्स नष्ट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com