खासदार खैरेंच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार - इम्तियाज जलील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

औरंगाबाद - शहर विकासात खासदार चंद्रकांत खैरे हे अडथळे आणून जातीय तणाव निर्माण करीत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता. 17) केला. एमआयएमचे नगरसेवक फेरोज खान यांना खासदार खैरे यांनी जातीय वाचक शिवीगाळ केली, त्यांनी धमकी दिल्याची ऑडिओ क्‍लिप आमदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांना ऐकवली. पोलिस आयुक्त हे खासदार खैरेंना पाठीशी घालत असल्याचा आरोपही करून या प्रकरणी कारवाई करावी अन्यथा थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवाबपुरा भागातील मालमत्ता हटविण्यावरून शुक्रवारी (ता. सोळा) खासदार खैरे व नगरसेवक फेरोज खान यांच्यात मोबाईलवरून चांगलीच वादावादी झाली. खासदार खैरे यांनी दंगल घडविण्याची धमकी दिल्याचा आरोप यावेळी श्री. जलील यांनी केला.

जिन्सी रोडवर काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. यात दोन मंदिरे आणि दोन मशिदी, एक अस्थाना यांचा काही भाग बाधित होत आहे. शहर विकासाचा मुद्दा असल्याने आम्ही नागरिकांना आवाहन केले. जे महादेव मंदिर यात पूर्णपणे बाधित होत आहे, त्याच्या पुनर्बांधणीसाठी 25 लाखांची आर्थिक मदत एमआयएमच्या नगरसेवकाने देऊ केली आहे. बांधकामासाठी विटा संबंधित ठिकाणी आणून टाकल्या आहेत. धार्मिक स्थळे हटविताना मुस्लिम-हिंदू नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. असे असताना, शहरातील नेतेमंडळी वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहे. खासदार खैरे हे संपूर्ण शहराचे आणि जिल्ह्याचे खासदार असून, केवळ एका धर्माची भूमिका घेत जातीयवाद करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी खासदारांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी श्री. जलील यांनी यावेळी केली.

खैरेंसाठी वेगळा कायदा का?
खासदार चंद्रकांत खैरे यांनी यापूर्वी वाळूज येथील एका धार्मिक अतिक्रमणाच्या मुद्यावरून तहसीलदार मुनलोड यांना शिवीगाळ केली होती. ती व्हिडिओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात हे प्रकरण गाजले. तेव्हाही पोलिसांनी खैरेंवर कारवाई केली नाही. त्यामुळे आमचा पोलिसांवरून विश्‍वास उडालाय, अशी खंत आमदार जलील यांनी व्यक्त केली.

मराठवाडा

नांदेड : सरकारी कार्यालयात एखादे काम करायचे असल्यास नागरिकांच्या कपाळावर आठया पडतात. कारण कोणत्या कामाला किती दिवस लागतील व...

02.18 PM

औरंगाबाद : वंदे मातरम् वरून आज (शनिवारी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. शिवसेना-भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये...

01.57 PM

मुखेड : मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे माध्यमिक व उच्चामाध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बाबुराव परशुराम पवळे यांनी शुक्रवारी सकाळी...

11.15 AM