स्वतंत्र सैनिकाच्या उपचारासाठी सिव्हील सर्जन स्वता धावले

parbhani
parbhani

परभणी - शासकीय रुग्णालयात वेळेवर व निट उपचार केले जात नाहीत अशी चर्चा आपण नेहमी ऐकत असतो. परंतु, या चर्चेला विराम देणारी घटना शनिवारी (ता.22) परभणी जिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाली. शहरातील एका जेष्ठ स्वांतत्र्य सेनानीची प्रकृती अत्यंत खराब असल्याचे समजताच जिल्हा शल्यचिकीत्सकांनी स्वत: त्यांच्या घरी जावून त्यांना रुग्णालयात भरती करून घेतले. 

शहरातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव सबनिस हे विद्यानगर भागातील त्यांच्या घरी राहतात. वार्धक्यामुळे गेल्या काही दिवासापासून ते घरात अंथरूणाला खिळून पडले होते. त्यात त्यांना अर्धांगवायूचा झटका ही आला होता. शनिवारी (ता.22) वसंतराव सबनिस यांचा मुलगा हेमंत सबनिस यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. जाविद अथर यांना याची माहिती दिली. श्री. अथर यांनी कामाचा व्याप व काही महत्वाच्या बैठका बाजूला सारून रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची रग्णवाहीका सोबत घेऊन श्री. सबनीस यांचे घर गाठले. त्यांची तेथे तपासणी करून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन आले. जिल्हा शल्यचिकीत्सक स्वत: जावून रुग्णाला घेऊन येत आहेत हे समजल्यानंतर रुग्णालयातील इतर डॉक्टर व परिचारिका ही सतर्क झाल्या. रुग्णालयाती अतिदक्षता विभागातील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. वसंतराव सबनिस यांना तेथे आणल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. 

आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, ते या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे याचा विसर पडू देता कामा नये. त्यांचे आपल्यावर थोर उपकार आहेत ही भावना मनात नेहमी असते. त्या आदरापोटी मी सबनीस काकांना स्वत: जावून घेऊन आलो. मी कोणतेही मोठे काम नाही नाही केले मी माझे कर्तव्य केले असे मी समजतो.
- डॉ. जाविद अथर. जिल्हा शल्यचिकीत्सक, परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com