आचारसंहितेच्या काळात पदाधिकाऱ्यांचा बैठकांचा अट्टहास 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

औरंगाबाद - दोन निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. तरीही स्थायी समिती सभापती व महापौर सभा बोलाविण्याचा अट्टहास करीत आहेत. या बैठकांत साधी चर्चाही होत नाही. प्रशासनाचा वेळ जातो आणि पदाधिकाऱ्यांच्या मानधनावर पाच-दहा मिनिटांच्या बैठकांसाठी आचारसंहितेच्या काळात जवळपास 20 ते 25 हजार रुपयांचा चुराडा झाला. 
आचारसंहिता काळात सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकांत नवीन निर्णय घेतले जात नाहीत असे यापूर्वी सोमवारी (ता. 16), गुरुवारी (ता.19) दोन्ही सभांत हे स्पष्ट करण्यात आले होते. यानंतरही सभापती मोहन मेघावाले यांनी सोमवारी (ता. 30) स्थायी समितीची बैठक बोलाविली. पाच मिनिटांत बैठक गुंडाळली. 

बैठकीसाठी येणाऱ्या सदस्यांना प्रत्येकी 100 रुपये मानधन आहे. सर्वसाधारण सभेच्या वेळी दिले जाणारे दुपारचे भोजन तत्कालीन आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी बंद केले. या चहापान, नाश्‍त्यासाठी नऊ ते दहा हजार रुपयांची, तर स्थायी समितीच्या बैठकीसाठी साधारणत: दोन ते अडीच हजार रुपयांची तरतूद आहे अशा तीन बैठकांवर केवळ चहापाण्यासाठीचा खर्च तीन हजार रुपये करण्यात आला. मानधनापोटी 115 निवडून आलेले नगरसेवक, तर पाच स्वीकृत सदस्य अशा 120 सदस्यांना प्रत्येकी 100 रुपयांप्रमाणे सर्वसाधारण सभेसाठी 12 हजार, तर स्थायी समितीच्या 16 सदस्यांचे दोन बैठकांचे 3 हजार 200 रुपये असे 15 हजार 200 रुपये केवळ सदस्यांच्या मानधनावर खर्च करण्यात आले. 

सभापती हजर, अधिकारी गैरहजर 
सोमवारी 11.30 वाजता बैठकीची वेळ होती, सभापती आणि पाच सदस्य 11.40 वाजता आले; पण सभागृहातील अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पूर्णपणे रिकाम्या होत्या. नगरसचिव व उपायुक्‍त धावत पळत आले. वंदे मातरम संपल्यानंतर अपर्णा थेटे, डॉ. सुहास जगताप, अय्युबखान, अफसर सिद्दीकी आल्यानंतर लगेच राष्ट्रगीत सुरू झाले आणि राष्ट्रगीत संपल्यानंतर सभापतींसह सर्वजण बाहेर निघत असतानाच सिकंदरअली हसमुख चेहऱ्याने आले. अधिकारी उशिरा आल्याबद्दल सभापतींनी सात्त्विक संताप व्यक्‍त केला.

Web Title: Code of Conduct during party meeting