जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी चालवला जेसीबी

Collector Shrikant
Collector Shrikant

लातूर - मागील काही वर्षापासून जिल्ह्यात सकाळ रिलीफ फंडातून पन्नास ठिकाणी जलसंधारणासह गाळ उपशाची कामे झाली. जिल्ह्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सकाळने एक कोटी रूपयाचा निधी दिला आहे. वृत्तपत्राच्या जगतात केवळ सकाळने हे वेगळेपण जपले आहे. सकाळच्या या कार्याला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी (ता. 16) आगळ्यावेगळ्या पद्धतीने सलाम केला. कबनसांगवी (ता. चाकूर) व हडोळती (ता. अहमदपूर) येथील सकाळ रिलीफ फंडाच्या कामाचे स्वतः जेसीबी चालवून उदघाटन केले व जेसीबीचा खोऱ्या उंचावून त्यांनी सकाळच्या कार्याला सलामी दिल्याची भावना व्यक्त केली.

मध्यंत्तरी सलग तीन वर्ष अपुरा पाऊस झाल्याने जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसल्या. लातूर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. यातूनच जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता जगासमोर आली. त्यानंतर दुष्काळाच्या उपाययोजना करण्यासोबत जिल्ह्याला दुष्काळातून कायमस्वरूपी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. यातून सरकारने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. त्यापूर्वीच सकाळ माध्यम समुहाने सकाळ रिलीफ फंडातून दुष्काळमुक्तीची चळवळ हाती घेतली होती. तलावात साठलेल्या गाळाचा उपसा करून पाणी साठवण क्षमता पुनरूज्जीवीत करण्यासाठी सकाळ रिलीफ फंडातून कामे हाती घेण्यात आली. त्यानंतर नाला खोलीकरण व रूंदीकरणाची कामे मोठ्या संख्येने घेण्यात आली. सकाळने प्रत्येक कामासाठी दोन लाखाचा निधी दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन लाखो रूपयाची कामे केली. काही गावांनी आपल्या शिवारातील सर्व नदी व नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम तडीस नेले. त्यासाठी सकाळ रिलीफ फंडाचे काम निमित्त ठरले. यामुळे गावे पाण्यासाठी समृद्ध व टॅंकरमुक्त झाली. यंदाही जिल्ह्यात सात ठिकाणी सकाळ रिलीफ फंडाचे काम सुरू झाली आहे. त्यापैकी कबनसांगवी व हडोळती येथील कामाचा प्रारंभ बुधवारी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते झाला. दोन्ही ठिकाणी त्यांनी स्वतः जेसीबी चालवून कामाचे उदघाटन केले. जेसीबीच्या खोऱ्याने माती उकरून त्यांनी नाल्याच्या बाहेर टाकली. त्यानंतर खोऱ्या उंचावला व यातून सकाळच्या कार्याला सलाम (सॅल्युट) केल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ माध्यम समुहाचे पूर्वीपासूनच सामाजिक विषयात मोठे योगदान आहे. सामाजिक प्रश्न मांडून त्याचे उत्तरही शोधून दिले. दुष्काळ व पाणीटंचाई निवारणाचे काम सरकार व प्रशासनाचे आहे, ही मानसिकता आता बदलली पाहिजे. दुष्काळातून कायमस्वरूपी मुक्तता मिळवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी ओळखून योगदान दिले पाहिजे. सकाळने दुष्काळाचे प्रश्न व समस्या न मांडता दुष्काळमुक्तीसाठी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून दिलेले योगदान प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. याच पद्धतीने समाजातील सर्व घटकांनी सामाजिक प्रश्नांसाठी पुढे आले पाहिजे. 

- जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com