फ्लिपकार्टवरून खरेदी केलेली सात शस्त्र जप्त

मनोज साखरे
बुधवार, 30 मे 2018

औरंगाबाद - फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शस्त्रे मागवणारावर छापे घालून गुन्हे शाखेने शस्त्रसाठा सोमवारी (ता. 28) रात्री केला. त्यानंतर पुन्हा बुधवारी (ता, 30) नागेश्वरवाडीस्थित कुरिअर कार्यालयात छापा घालून आणखी सात शस्त्र पोलिसांनी जप्त केली. यात काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या सात शस्त्रांची खरेदी फ्लिफकार्टवरून ऑनलाईन झाली आहे. 24 जणांनी फ्लिपकार्टवरून अशी शस्त्र मागवली होती, यात सोमवारी रात्री सात जणांना पोलिसांनी अटक केली. शहरातील 24 जणांनी फ्लिपकार्टवरून शस्त्र मागवली होती. या सर्वांचे लोकेशन पोलिसांनी घेतले, त्यानंतर पुन्हा बुधवारी पोलिसांनी नागेश्वरवाडीत एकार्ट या कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पोलिसांनी छापा घातला अजून कारवाई सुरूच असून सहा तलवार, एक चाकुसह काहीजण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Confiscated seven weapons purchased from Flipkart

टॅग्स