इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सकाळी ११ वाजता पैठणगेट येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र १२.३० वाजता रॅलीला सुरवात झाली.

औरंगाबाद - वारंवार होणाऱ्या इंधनदरवाढीमूळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले असून, या निषेधार्थ गुरुवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयावर साय कल रॅली काढण्यात आली. 'मोदी सरकारचे करायचे काय...' 'भाजप सरकारचा धिक्कार असो', अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
 
सकाळी ११ वाजता पैठणगेट येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र १२.३० वाजता रॅलीला सुरवात झाली. सायकलला झंडे लावून व हातात सरकार विरोधी फलक घेऊन लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Congress rally against fuel price hike