बीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल

बीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल

बीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी (ता. २५) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.  

शहरातील अजिजपुरा भागात मोहम्मद कालीमूर मोहम्मद जिखार रहेमान यांनी पालिकेकडे बांधकामासाठी परवानगी मागितली. पालिकेने तळमजला, पहिला मजल्यासाठी परवानगी दिली. मात्र, मोहम्मद कालीमूर यांनी पालिकेने दिलेल्या नियमात बांधकाम न करता तेथे शाळा खोल्या उभारल्या. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत याबाबत एकाने तक्रार केली. त्यानंतर पालिकेच्या स्वच्छता विभागाने पाहणी केली. नोटीस बजावल्यानंतरही बांधकामात सुधारणा केली नाही. नंतर नगररचना विभागाने नोटीस दिली, तरीही संबंधिताने दाद दिली नाही.

वारंवार नोटीस देऊनही योग्य ती कार्यवाही न झाल्याने पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व्ही. टी. तिडके यांनी मंगळवारी बीड शहर ठाणे गाठून मोहम्मद विरोधात फिर्याद दिली. यावरून मोहम्मद विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, २०१५ पासून हे बांधकाम सुरू होते. तळमजला सोडून दोन मजली ही इमारत आहे. याठिकाणी बांधकाम करताना कसलीही जागा सोडली नाही. तसेच इतर नियमांचेही उल्लंघन केले आहे. विशेष म्हणजे हा परवाना घरासाठी होता. परंतु सध्या याठिकाणी एक उर्दू शाळा भरविली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com