कंत्राटदारांची बिले निघतात, महत्त्वाच्या कामांची का नाही? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

औरंगाबाद - मुख्य लेखाधिकारी महापालिकेत थांबत नाहीत, ते कुठे काम करतात माहीत नाही, पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मर्जीतील कंत्राटदारांची बिले मात्र काढली जातात, महत्त्वाच्या कामांची बिले का निघत नाहीत, असा सवाल शनिवारी (ता. २१) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला.

औरंगाबाद - मुख्य लेखाधिकारी महापालिकेत थांबत नाहीत, ते कुठे काम करतात माहीत नाही, पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मर्जीतील कंत्राटदारांची बिले मात्र काढली जातात, महत्त्वाच्या कामांची बिले का निघत नाहीत, असा सवाल शनिवारी (ता. २१) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला.

महापालिकेच्या स्थायी समितीची शनिवारी सभापती गजानन बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला तब्बल १२ अधिकारी गैरहजर होते. त्यात मुख्य लेखाधिकाऱ्याचा पदभार असलेले महावीर पाटणी यांचाही समावेश होता. याबाबत संगीता वाघुले, अजीम अहेमद, सीताराम सुरे यांनी प्रश्‍न उपस्थित केले. श्री. पाटणी कधीच मुख्यालयात सापडत नाहीत. कुठे बसतात, कुठे काम करतात? याची कुणालाच कल्पना नाही. छोट्या-छोट्या कामांची बिले निघत नसल्याने वॉर्डांतील विकासकामे ठप्प आहेत, असा श्रीमती वाघुले व अजीम अहेमद यांनी आरोप केला. पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कंत्राटदारांची बिले काढली जातात, अशी टीका श्री. सुरे यांनी केली. त्यावर सभापतींनी वॉर्ड अधिकाऱ्यांनी आपल्या दालनात बसून काम करावे व आतापर्यंत लेखा विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या बिलांची यादी पुढील बैठकीत सादर करावी, असे आदेश दिले. स्थायी समितीने आदेश देऊनही आपल्या वॉर्डात स्वच्छता कर्मचारी मिळाले नसल्याची तक्रार कीर्ती शिंदे यांनी केली. अतिरिक्त आयुक्तांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. 

फवारणी नाही, तक्रारी कायम 
वॉर्डांत फवारणीसाठी कर्मचारीच येत नसल्याचा आरोप मनीषा मुंडे, स्वाती नागरे, सुरे यांनी केला. तीन महिन्यांपासून आपल्या वॉर्डात एकही कर्मचारी फिरकला नसल्याचे राजू वैद्य म्हणाले.

एकाही अधिकाऱ्याला वेळ नाही 
महापालिकेचे सर्वच अधिकारी कचऱ्याच्या कामात गुंतले आहेत. एकाही अधिकाऱ्याला वेळ नाही. इतर महत्त्वाच्या कामांचे काय करायचे? असा प्रश्‍न सुरे यांनी केला. 

Web Title: Contractor bills are billed

टॅग्स