'मैत्रेय'च्या अध्यक्षासह सहाजणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

बीड - मैत्रेय प्लॉटर्स ऍण्ड स्ट्रक्‍चर्स कंपनीने जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची दोन कोटी 71 लाख 93 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कंपनीच्या अध्यक्ष वर्षा सत्पाळकर यांच्यासह सहाजणांविरुद्ध शुक्रवारी (ता. 16) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मैत्रेय प्लॉटर्स ऍण्ड स्ट्रक्‍चर्स कंपनीने अनेक महिलांना जास्त रकमेचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक करून घेतली. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कंपनीचे कार्यालय बंद असून, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही दूरध्वनी बंद आहेत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदार महिलांच्या लक्षात आले. यानंतर याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 15) शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. यानंतर याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात "मैत्रेय'च्या अध्यक्ष सत्पाळकर, संचालक प्रसाद परुळेकर, लक्ष्मीकांत नार्वेकर, विजय तावरे, नितीन चौधरी, भरत मेहेर या सहाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक कस्तुरे यांनी दिली.