परभणी : सावंगी खुर्द वाळू धक्क्यावर पोलिसांची धडक कारवाई...

४ कोटी ५२ लाखाचा मुद्देमाल जप्त
crime news Illegal sand excavation police action 4 crore 52 lakhs Material confiscated parbhani
crime news Illegal sand excavation police action 4 crore 52 lakhs Material confiscated parbhanisakal

परभणी : जिल्ह्याभरात अवैध वाळू उत्तखन्न करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यातंर्गत शनिवारी (ता.२१) रात्री सावंगी खूर्द (ता.परभणी) येथील पूर्णा नदीतील वाळू धक्कयावर सहाय्यक पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या वाळू धक्क्यावरून नियमबाह्य रित्या वाळू उचलणाऱ्यांवर पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून धडक कारवाई सुरु केली आहे. आता पर्यंत पोलिसांनी चार मोठ्या कारवाया केल्या असून शनिवारी (ता.२१) रात्रीची जिल्ह्यातील पाचवी मोठी कारवाई आहे.

सावंगी (ता.परभणी) गावाजवळून वाहणाऱ्या पूर्णा नदीतून वाळू उपसा सुरु आहे. या ठिकाणी असलेल्या वाळू धक्क्यावरून नियमबाह्य रित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षक जयंत मीना यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अपर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक अविनाशकुमार व ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.शिरतोडे यांच्या पथकाने सावंगी येथील वाळू धक्क्यावर शनिवारी रात्री छापा मारला. या ठिकाणी पूर्णा नदी पात्रात उभे असलेले चार हायवा ट्रक, १२ टिप्पर, १ ट्रॅक्टर, चार पोकलेन मशईन, सहा मोटारसायकल व १ बोट सक्शन पोलिसांनी सापडली. या ठिकाणावरून वाळू हायवा, टिप्पर व ट्रॅक्टरमध्ये भरत असतांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी या ठिकाणावरील सर्व साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची रक्कम चार कोटी ५१ लाख ८५ हजार इतकी होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या ठिकाणी महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही पुढील कारवाईसाठी पंचनामा केला आहे.

ठेकेदारासह इतरांवर गुन्हे दाखल

सावंगी येथील वाळू धक्क्यावर नियमबाह्य रित्या वाळू उपसा केला जात असल्या प्रकरणी पोलिसांनी परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात धक्का ठेकेदार, उप ठेकेदार, सर्व वाहनांचे चालक, मालक, पोकलॅन मशीन चालक व मालक, बोट चालक, मालक व तेथील काम करणाऱ्या लोकांवर विविध कलमाद्वारे गुन्हा नोदं कला आहे. तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाद्वारेही गुन्हे नोंद झाले आहेत अशी माहिती सहायक पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com