घरगुती वादातून पत्नीचा कोयत्याने खुन करून पती फरार

वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे येथील घटना
husband killed wife
husband killed wife sakal

वसमत : घरगुती कारणावरुन पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने वार करुन खुन केल्याची घटना पिंपळा चौरे येथे सोमवार ता.७ सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान आरोपी पती खुन करुन फरार झाला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की, पिंपळा चौरे येथील श्रावण गंगाधर चौरे वय ४० हा गावालगत असलेल्या आपल्या शेताच्या आखाड्यावर कुटूंबासह राहतात.

दरम्यान सोमवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान श्रावण चौरे व त्यांची पत्नी पार्वतीबाई चौरे वय ३३ यांची घरगुती कारणावरुन कुरबुरी झाली. यावेळी रागाने बेभान झालेल्या श्रावण चौरे याने धारदार कोयत्याने पत्नी पार्वतीबाई चौरे यांच्या चेहर्यावर व मानेवर सपासप वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच आरोपी पती श्रावण चौरे हा घटनास्थळावरुन फरार झाला. दरम्यान पोलिस पाटील यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात तात्काळ घटनेची माहिती कळवली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच फिंगर प्रिंट ब्यूरो व श्वाण पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रेताची उत्तरीय तपासणी व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीच्या शोधासाठी पोलीसांचे तीन पथकाकडून शोध सुरु असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com