नांदेड : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार अटक 

pistols
pistols

नांदेड : शहरात दरोडा टाकण्यासाठी शस्त्रांसह एका कारमध्ये दबा धरून बसलेल्या अट्टल गुन्हेगारांना सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकानी अटक केले. त्यांच्याकडून मोठ्या धाडसाने चार पिस्तुल, सहा जीवंत काडतुस आणि एक कार जप्त केली. ही कारवाई रविवारी (ता. 14) मध्यरात्रीला मल्टीपर्पज मैदानावर केली. 

सध्या नवरात्र सुरू असून येणाऱ्या काळात दसरा-दिवाळी तसेच शिख समाजाचे हल्लाबोल हे उत्सव सुरू होत आहेत. शहरात व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये म्हणून स्थानिक पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिले आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखेला फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची धरपकड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे हे आपले सहकारी राजू पांगरीकर, बालाजी सातपुते, शेख जावेद (गोरा), तानाजी येळगे, घुंगरुसिंग टाक यांच्यासह रविवारी रात्री शहरात गस्त घालत होते. यावेळी श्री. दिघोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी सापळा लावून वजिराबाद परिसरात एका कारमध्ये बसलेल्या अट्टल गुन्हेगारांना अटक केली. त्यात कुख्यात गुन्हेगार पंजाब, प. बंगाल, उत्तरप्रदेश, हरियाणा व महाराष्ट्र राज्यातून फरार असलेला हरविंदरसिंग उर्फ रिंधा चरणसिंग संधु याचा उजवा हात समजल्या जाणारा व त्याच्या नावाने खंडणी वसुल करणारा जग्गी उर्फ जगदीशसिंग दिलबारसिंग संधु, करणसिंग उर्फ किरण किन्हासिंग बावरी, राहूल सुभाष ठाकूर यांना अटक केली.

त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, एक रायफल, सहा जीवंत काडतुस, एक एअर पिस्टल, खंजर, लोखंडी टामी, नायलॉन दोरी व मास्क आणि कार जप्त केले. विनोद दिघोरे यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद ठाण्यात भादवीच्या कलम ३९९, ४०१, ४०२, सहकलम ३/ २५, ४/ २५, ३/ २८ आणि २७ (२) भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. खून, दरोडा, जबरी चोरी, खंडणी असे गंभीर गुन्हे असल्याचे पोलिस अभिलेखावर नोंद आहेत. या पथकाचे पोलिस अधिक्षक संजय जाधव व डॉ. अक्षय शिंदे यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com