दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

लातूर - भारत स्टेज फोर या मानकाशी सुसंगत नसलेल्या म्हणजेच भारत स्टेज थ्री (बीएस-थ्री) इंजिन असलेल्या सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने ही वाहने एक एप्रिलपासून बंद होणार आहेत. त्यामुळे अशा वाहनांवर दहा ते वीस हजारांची सूट देत गुरुवारी (ता. 30) शहरातील सर्वच शोरूममध्ये वाहने विक्री करण्यात आली. या दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. शहरात सायंकाळपर्यंत पाचशेपेक्षा जास्त वाहने विक्री झाली आहेत. या वाहनांचे कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी रजिस्ट्रेशन होणे बंधनकारक आहे. असे झाले नाही तर ही वाहने भंगारमध्ये जाणार आहेत. 

भारत स्टेज फोर या मानकाशी सुसंगत नसलेल्या म्हणजेच भारत स्टेज थ्री (बीएस थ्री) इंजिन असलेल्या सर्व वाहनांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून केली जाणार आहे. त्यामुळे या तारखेनंतर बीएस थ्री इंजिन असलेले वाहन विकता येणार नाही. कोणी विकलेच तर त्याचे आरटीओ कार्यालयात रजिस्ट्रेशन केले जाणार नाही. हे वाहन भंगारच होणार आहे. त्यामुळे दुचाकीची निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी गुरुवारी (ता. 30) अशा वाहनांवर भरघोस डिस्काउंट जाहीर केले. यात दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत होती. याची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सध्या सर्वच कंपन्यांच्या दुचाकी पन्नास ते सत्तर हजार रुपयांच्या घरात आहेत. यात दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत सूट मिळाल्याने अशी वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या होत्या. सर्वच शोरूममध्ये गर्दी दिसून आली. विक्री केलेल्या दुचाकीची माहिती तातडीने ऑनलाईनवर भरण्याचे कामही शोरूम चालकाकडून करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत शोरूम सुरू होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाणार आहे. एक एप्रिलपासून 
बीएस थ्री इंजिन असलेल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन केले जाणार नाही. 31 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. सायंकाळपर्यंत आमचे निरीक्षक गाड्यांची तपासणी करतील. 
- पी. जी. भालेराव, प्रादेशिक परिवहन अधिकारी. 

Web Title: Customers rush to buy the bike