सायबर चालकाने घातला शेकडो विद्यार्थ्यांना गंडा

The cyber crew has fooled hundreds of students
The cyber crew has fooled hundreds of students

उस्मानाबाद - शहरातील एका सायबर चालकाने शेकडो विद्यार्थ्यांना गंडा घालून लाखो रुपये हडप करून फरारी झाला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले असून, शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून सीईटी परीक्षेला बसू देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही संबंधित सायबर चालकाने असाच प्रकार करून पैसे उकळून फरारी झाला होता. पुन्हा त्याने असा प्रकार केल्याने पोलिस प्रशासनासह विद्यार्थी, पालकांची झोप उडाली आहे. 

शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या परिसरात रवींद्र गरड याचे सायबर कॅफे आहे. मेडीकल, इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी गरड स्वतःच्या सायबर कॅफेतून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून देत होता. अर्ज भरल्यानंतर शासनाच्या वेबसाईटवर अपलोड होत होते. अर्ज भरल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची फीस भरणे आवश्‍यक असते. प्रत्येक विद्यार्थ्याने गरड याच्याकडे एक हजार 300 रुपये दिले आहेत. गरड याने शासनाकडे ही फीस भरलीच नाही. 10 मे 2018 रोजी परीक्षा असल्याने अनेकांना हॉलतिकीट मिळाले नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सायबरचालक गरड याने पैसे भरले नसून, त्याचे कॅफे बंद असल्याचे लक्षात आले. आतापर्यंत 81 विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्याकंडे धाव घेतली आहे. यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांची यामध्ये फसवणूक झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव 
दरम्यान, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांनी गुरुवारी (ता. 26) जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आमची फसवणूक झाली असून, संबंधित सायबर चालकाला अटक करून आम्हाला परीक्षा देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यामध्ये आश्‍लेषा व्यंकटेश चौरे, मिसबा मोरवे, दीपक गायकवाड आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

गेल्या वर्षीच्या कारवाईचे काय? 
गेल्या वर्षीही गरड याने अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना गंडा घातला होता. त्यावेळी संबंधित विद्यार्थ्यांना स्पेशल केस म्हणून परीक्षेला बसू दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र वर्षभरानंतर तोच गरड शहरात येऊन पुन्हा स्वतःचा व्यवसाय थाटतो. अनेकांची फसवणूक करतो, अन् फरारी होतो. मग गेल्या वर्षी झालेल्या प्रकारावर पोलिसांनी काय कारवाई केली, असा प्रश्‍न विद्यार्थी वर्गातून विचारला जात आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com