मान्सूनपुर्वीच्या वादळी वाऱ्याने उस्मानाबादेत नुकसान

आनंद देशट्टे
रविवार, 27 मे 2018

आलूर येथे शनिवारी रात्री वादळी वाऱ्याने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज कोसळून शांतप्पा शरणप्पा समन यांची गाय दगावली. शांतप्पा तावडे यांच्या ढाब्यावरील पत्रे उडाल्याने ते गंभीर जखमी झाले.

आलूर - वादळी वाऱ्यामुळे शनिवारी (ता. 26) रात्री आलूर (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे अनेक घरांवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले. विजेचे रोहित्र, खांबही उन्मळून पडले.

आलूर येथे शनिवारी रात्री वादळी वाऱ्याने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज कोसळून शांतप्पा शरणप्पा समन यांची गाय दगावली. शांतप्पा तावडे यांच्या ढाब्यावरील पत्रे उडाल्याने ते गंभीर जखमी झाले. तावडे याना उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे. सिद्धप्पा मल्लप्पा बोळदे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने 45 ते 50 पोते धान्याचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे विजेचे रोहित्र कासळले. आलूर ते मुरूम या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक बंद झाली होती. ग्रामपंचायतीने जेसीबी लावून रस्त्यावर पडलेले झाडे हटवून रविवारी (ता. 27) रस्ता मोकळा करून दिला.ज्योती तांडा, इंदिरा नगर व गावातील अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा बंद आहे. तलाठी दीपक चव्हाण व सुधाकर हळणुरे यांनी रविवारी नुकसानीचे पंचनामे केले असून, गावातील सर्वच नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. वीजपुरवठा लवकर सुरळीत करावा, अशी मागणी आहे. गावात अनेक रस्त्यावर विजेचे खांब वाकले असून, विजतारा तुटून रस्त्यावर पडल्या आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Damage in Osmanabad because of Thunderstorm