हनुमाननगरमध्ये पाण्यावरून वादावादी तीन गल्ल्यांत टंचाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

औरंगाबाद - पाण्याची टाकी आली; मात्र हनुमाननगरमधील 1 ते 3 नंबरच्या गल्लीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही. बुधवारी (ता. 13) गल्ली नंबर एकमधील पाणी सोडण्याचा व्हॉल्व्ह बंद करण्यावरून वादावादी झाली.

हनुमाननगरच्या 1 ते 3 गल्ल्यांतील जवळपास पाचशे घरांना पाणीपुरवठ्यासाठी गल्ली क्रमांक एकमध्ये व्हॉल्व्ह आहे. यामध्ये 2 आणि 3 क्रमांकाच्या गल्ल्यांना कमी प्रमाणात पाणी मिळते. बुधवारी पाणी सोडल्यानंतर गल्ली नंबर एकमधील व्हॉल्व्ह बंद करू नये, आणखी काही वेळ पाणी येऊ द्यावे, यासाठी महिला गल्ली नंबर एकमध्ये गेल्या होत्या; मात्र येथील नागरिकांचा इतर गल्लीमधील नागरिकांशी चांगलाच वाद झाला. या भागात काही जणांनी अनेक कनेक्‍शन घेतलेले असल्याने चार भांडेही पाणी मिळणे अवघड झालेले आहे. किमान पाऊण तास पाणी मिळणे आवश्‍यक असताना गल्ली क्रमांक दोन आणि तीनमध्ये 15 मिनिटेही पाणी येत नसल्याची येथील रहिवाशांची तक्रार होती. स्थानिक नगरसेवकासमोर नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या.

Web Title: dispute on water shortage