पिंपळगावात सुमारे शंभर रुग्णांना मोफत मेडिसिनचे वाटप

पिंपळगावात सुमारे शंभर रुग्णांना मोफत मेडिसिनचे वाटप

फुलंब्री : पिंपळगाव वळण (ता.फुलंब्री) येथील ग्रामपंचायत कार्यालय व फुलंब्रीचे जय धन्वंतरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी व मेडिसीन वाटपाचे शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे शंभर पेक्षा जास्त रुग्णांना धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ.राजेंद्र गायके यांनी मोफत तपासणी केली. रोहिणी मेडिकलच्या विजया इधाटे व फार्मासिस्ट नंदकिशोर नागरे यांनी मोफत मेडिसिन वाटपासाठी सहकार्य केले.

ग्रामपंचायतीचे सरपंच कांताबाई अरुण वाहटूळे यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील रुगांना गावातच योग्य तपासणी व मोफत मेडिसिन मिळावेत यासाठी सरपंच वाहटूळे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यामुळे सरपंचांनी फुलंब्रीतील जय धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ.राजेंद्र गायके यांच्याशी संपर्क साधून या आमच्या गावात मोफत शिबीर घेण्याचे सांगितले. डॉ.गायके यांनी होकार देत मोफत तपासणीसह मोफत मेडिसिन वाटपाचे आयोजन केले.

या शिबिराच्या सर्वप्रथम विद्याच्या आराध्य देवता सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ वाहटूळे यांनी या शिबिराचे उदघाटन केले. या शिबिरात सुमारे शंभर पेक्षा जास्त रुग्णांना तपासुन मोफत मेडिसिन वाटप करण्यात आले. यावेळी अरुण वाहटूळे, ग्रामपंचायत सदस्य द्वारकादास वाहटूळे, कचरू जाधव, प्रेमीलाबाई क्षीरसागर, ज्ञानेश्वर केजभट, संजय वाहटूळे, रंगनाथ वाहटूळे, आजीनाथ वाहटूळे, जयसिंग वाहटूळे, भारत वाहटूळे, बबन लगड, रंगनाथ केजभट, तेजराव पल्हाळ, आजीनाथ केजभट, अंबादास शिरसाठ, म्हसूद इनामदार, काशीनाथ गायकवाड, राहुल वाहटूळे, रमेश वाहटूळे आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com