सुशिक्षित बेरोजगार निघाले वाहनचोर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

अल्पवयीन मुलासह चौघांना अटक, एक कार, १६  दुचाकी जप्त
वाळूज - वाळूज एमआयडीसी पोलिसांनी वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्या ताब्यातील सात लाख रुपये किमतीची वाहने जप्त केली. यात १६ दुचाकी व एक कार, अशी एकूण १७ वाहने आहेत. विशेष म्हणजे या वाहनचोर टोळीत ४ सुशिक्षित बेरोजगार असून एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ही कारवाई वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (ता.१२) केली.

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जानेवारी ते जून या पहिल्या सहा महिन्यांच्या काळात वाहनचोरांनी धुमाकूळ घालून चारचाकी वाहनांसह विविध कंपनींच्या जवळजवळ ६० दुचाकी वाहने लंपास केली. या प्रकारामुळे वाहनधारक मोठ्या आर्थिक संकटात सापडले. वाहनचोरीचा हा उच्चांक गाठून चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारचे आव्हानच दिले होते. या वाहनचोरांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी रात्रंदिवस गस्त घालून वाहनचोर दोन टोळ्यांच्या मुसक्‍या आवळल्या. या वाहनचोरांच्या टोळीत साईनगर, सिडको येथील संदीप बाबूराव कोळेकर (१९), अमर शांताराम घायवट (१९), कुमार बेदानंद मिश्रा (१९), खवड्या डोंगर, तीसगाव येथील कृष्णा पोपटराव वाळके (१९) व एक विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन) अशा पाच जणांचा समावेश आहे. या वाहन चोरांच्या टोळीकडून १ मारुती कार व विविध कंपनींच्या १६ दुचाकी, असा एकूण ७ लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे, पोलिस कर्मचारी वसंत शेळके, वसंत जिवडे, रामदास गाडेकर, बाळासाहेब आंधळे, भागीनाथ बोडखे, संघराज दाभाडे, पोलिस शिपाई योगेश कुलकर्णी, राजकुमार सूर्यवंशी, संतोष जाधव, गोकूळ वाघ यांच्या पथकाने केली.