नोव्हेंबरमध्ये राज्यात शैक्षणिक बंद !

Education closed in November in the state
Education closed in November in the state

औरंगाबाद : शिक्षण क्षेत्राविषयीच्या महाराष्ट्र शासनाच्या
धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने 2
नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा शैक्षणिक बंद पाळण्यात येणार आहे. पवित्र
वेबपोर्टल हा शासन आदेश रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसह शिक्षणविषयक अन्य जिव्हाळ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा बंद पाळण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भात रविवारी (ता.14) पत्रकार परिषदेत श्री. पाटील यांनी शासनाच्या
शिक्षण विषयक धोरणावर जोरदार टिका करताना, राज्यात प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे खाजगी शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात देत असताना, दुसरीकडे शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत शासन मनमानी धोरण अवलंबत आहे. राज्यात पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे सर्व खाजगी
व्यवस्थापनाच्या शाळामधील शिक्षक भरती प्रक्रिया खाजगी शाळांतील कर्मचारी सेवाशर्ती नियमावलीनुसार खाजगी संस्थांचे कर्मचारी भरतीचे अधिकार राज्य शासनाने स्वतःकडे घेतले आहेत, यामुळे शासनाने पाठवलेल्या शिक्षकांनाच रुजू करुन घ्यायचे त्याची मुलाखत न घेताच सेवेत रुजू करुन घ्यायचे अशी यात तरतुद आहे. आमचा पवित्र वेबपोट्रलला विरोध नाही मात्र त्यातील अन्यायकारक तरतुदींना विरोध आहे. पवित्र वेबपोर्टलबाबतचा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com