शिक्षण हेच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रवेशद्वार - लोमटे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

लातूर - माणसाच्या जीवनाला सुसंस्कार, ज्ञान आणि चारित्र्याची जोड असल्याशिवाय माणूसपण प्राप्त होत नाही. यासाठी शिक्षण हेच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रवेशद्वार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.

लातूर एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला ५० वर्षे झाल्यानिमित्त शनिवारी (ता. २१) झालेल्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष ॲड. मनोहरराव गोमारे अध्यक्षस्थानी होते. 

संस्थेचे उपाध्यक्ष डी. जी. शेळके, सचिव डी. एन. शेळके, कोषाध्यक्ष नागनाथराव कनामे, सहसचिव प्रल्हाद दुडिले, संचालक डॉ. एस. एन. जटाळ, विनायक पिनाटे, हरिश्‍चंद्र येरमे, व्यंकटराव कुल्ले, प्रकाश शिंगडे, विठ्ठलराव इगे, पंडित नलवाड, नाथराव कोले, रघुनाथ सुडे, तुकाराम किटेकर, चंदुलाल बलदवा, मुख्याध्यापक नावनाथ ढगे, उत्तम केसाळे, उपमुख्याध्यापिका श्रीमती बस्तापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. गोमारे यांनी लातूर एज्युकेशन संस्थेच्या गेल्या ५० वर्षांतील कार्य सांगून ज्ञानेश्वर विद्यालय, जवाहर प्राथमिक शाळा, रामचंद्र बलदवा ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, संत तुकाराम विद्यालय (जगळपूर बु.) या शाळांच्या कार्याचा आढावा घेतला.

जी. पी. साबदे व एस. पी. साबदे यांनी सूत्रसंचालन केले. यासाठी उपमुख्याध्यापक सुधीर चेरेकर, पर्यवेक्षक सोपान वाघमारे, प्रकाश पेद्देवाड, सहशिक्षक माधव क्षीरसागर, सुधाकर बुरगे, भाऊसाहेब उमाटे, संजय मलवाडे, संदीप मार्लापल्ले, विश्वास मामडगे, अजय आरदवाड यांनी पुढाकार घेतला. 

या प्रसंगी शिक्षक व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Education is the gateway to personality development