शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध उस्मानाबादेत अखेर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

उस्मानाबाद - महिला कर्मचाऱ्याची छळवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील वादग्रस्त शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन नागनाथ जगताप यांच्यासह दोघांविरुद्ध अखेर आनंदनगर पोलिस ठाण्यात सोमवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पीडितेने पोलिसात तक्रार देऊनही यापूर्वी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती.

शिक्षणाधिकारी जगताप यांनी महिला कर्मचाऱ्याला गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईलवर अश्‍लील एसएमएस करण्याचे प्रकार सुरू केले होते. व्हॉट्‌सऍपद्वारेही मेसेज पाठविले जात होते. याशिवाय अश्‍लील संभाषण करण्याचेही प्रकार सुरू होते. संबंधित महिलेने त्यांना समज देत कडाडून विरोध केला. चार-पाच दिवसांपूर्वी संबंधित महिला दुचाकीने कामावर जात असताना जगताप यांनी चारचाकी वाहन आडवे लावून तिला अडविले. शिवीगाळ, तसेच दमदाटी करीत लज्जास्पद मागणी केली. नकार देताच तिचा हात फ्रॅक्‍चर केला. जगताप व सुभाष वीर यांनी संगनमताने हा प्रकार केल्याप्रकरणी या दोघांविरोधात आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: education officer crime