वीजचोरांवर धडक कारवाई

Electricity
Electricity

औरंगाबाद - महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातर्फे मराठवाड्यातील वीज चोरीविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. यात फिरत्या भरारी पथकाने छापे टाकून ५४९ वीजमीटरची तपासणी केली. यात ३२९ वीजग्राहक चोरी करताना आढळले. त्यांना दोन कोटी ४३ लाख ४९ हजार ९२० रुपयांच्या दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली आहे. संबंधितांनी सदर बिलांचा भरणा न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.  

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात २७ ते २९ ऑगस्टदरम्यान औघोगिक व वाणिज्यिक ग्राहकांवर फिरत्या पथकांनी छापे टाकले. यामध्ये ५४९ वीजमीटरची तपासणी झाली असून, ३२९ ग्राहक वीजचोरी करताना आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात-३८, जालना-३४, नांदेड-२९, हिंगोली-४७, बीड-४७, लातूर-३४, उस्मानाबाद- ६०, परभणी -४० वीजचोर अढळून आले. मोहिमेत पुणे प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक, सुरक्षा व अंमलबजावणी शिवाजी इंदलकर, कोकण परिक्षेत्राचे उपसंचालक सुमित कुमार, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी उपसंचालक ए.ए.खान, औरंगाबाद परिक्षेत्राचे उपसंचालक मधुकर बत्तलवाड यांनी नोडल ऑफिसर म्हणून काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com