जातीयवादी वृत्तीला मतदार थारा देणार नाही- आमदार सतीश चव्हाण

marathwadauniversity
marathwadauniversity

उस्मानाबाद : मागील दोन वर्षांपासून विद्यापीठात हेतुपूर्वक विद्वेषाचे वातावरण निर्माण केले जात असून, जातीयवादी वृत्तीला खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे. परंतु, जातीयवादी वृत्तीला या निवडणुकीत सुजाण मतदार थारा देणार नाहीत, असा विश्वास मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला. विद्यापीठ उत्कर्ष पॅनलच्या प्रचार बैठकीचे येथील बिल गेट्‌स महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एम. डी. देशमुख, डॉ. रमेश दापके, डॉ. अशोक घोलकर, डॉ. जयसिंग देशमुख, डॉ. बी. एल. चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी आमदार श्री. चव्हाण म्हणाले, की विद्यापीठ अधिसभा सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी पहिल्यांदाच चुरशीचे वातावरण निर्माण करून मतदारांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जिल्ह्यातील तज्ज्ञ मंडळींनी सातत्याने दिवंगत आमदार वसंत काळे यांच्या माध्यमातून विद्यापीठाच्या राजकारणाला सकारात्मक पाठबळ दिलेले आहे. जिल्ह्याचा विद्यापीठात त्यामुळेच मोठा दबदबा असल्याचेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्रसंगी राजकीय किंमत चुकवून नामविस्तार करण्याचा ठराव माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी तडीस नेला. त्याचबरोबर येथे उपकेंद्र उभारणीसाठी माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दिलेले योगदान मोठे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक, विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांचे प्रामाणिक प्रतिनिधित्त्व करण्यासाठी विद्यापीठ उत्कर्ष पॅनल कटिबद्ध असल्याचाही विश्वास यावेळी श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला. प्रा. संभाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी तांबे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com