पत्नीनेच दिली पतीच्या खुनाची सुपारी ; बँक अधिकाऱ्याच्या खुनाचा उलगडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

जितेंद्र नारायण होळकर (वय :45 रा. छत्रपती नगर, सातारा परिसर, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. ते शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक होते. शुक्रवारी (ता. 8) रात्री जेवण करून अकराच्या सुमारास कुटुंबीय झोपले होते. मात्र त्यानंतर शनीवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी आणि  सातारा पोलिसांनी कसून तपास केला.

औरंगाबाद : औरंगाबादेतील सातारा परिसर येथील छत्रपतीनगरात जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकाऱ्याच्या खूनाचा चोवीस तासातच औरंगाबाद पोलिसांनी उलगडा केला. पती संशय घेतो म्हणून चक्क पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिली होती. यात पत्नीसह चौघांना पोलिसांनी रविवारी (ता. 10) जेरबंद केले. हि गंभीर घटना शनीवारी (ता. 9) पहाटे घडली होती.

जितेंद्र नारायण होळकर (वय :45 रा. छत्रपती नगर, सातारा परिसर, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. ते शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक होते. शुक्रवारी (ता. 8) रात्री जेवण करून अकराच्या सुमारास कुटुंबीय झोपले होते. मात्र त्यानंतर शनीवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी आणि  सातारा पोलिसांनी कसून तपास केला. त्यावेळी संशयाची सुई जितेंद्र यांची पत्नी भाग्यश्री कडे वळली. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने खुनाची सुपारी दिल्याची बाब समोर आली. पती भाग्यश्रीवर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणे होत असे. त्यातून तिने पतीचा काटा काढण्याचा कट रचला.  यानंतर तीने पतीच्या खुनाची सुपारी तीन जणांना दिली. ठरल्यानुसार पतीचा तिघांनी मिळून शनीवारी (ता. 9) झोपेतच निर्घृण खून केला. यानंतर मारेकरी पसार झाले. दोन लाखात तिघांना सुपारी दिली व अनामत 10 हजार रुपये तिने दिलेत. अशी कबुली पत्नीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली. संशयित आरोपीत एका राजकीय पक्षांचा कार्यकर्ता असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स