पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी; गाेंधळामुळे प्रशासन हैराण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पावसाचा बेपत्ता व प्रशासनाच्या नियाेजनाअभावी कामकाजामुळे शेतकरीवर्गात आक्राेश हाेत आहे. हणेगाव येथील बँकेत पीक विमा स्वीकारण्यास चालू झाल्यानंतर गुरुवारी (ता. २७) या भागातील असंख्य शेतकऱ्यांनी बँक उघडण्यापूर्वीच बँकेसमाेर माेठी गर्दी केली हाेती.

हणेगाव- बँक व्यवस्थापनाने पीक विमा भरून घेण्याची प्रक्रिया चालू केल्यानंतर शेतकऱ्यांची तुफान गर्दी बँकेसमाेर येवून ठेपल्याने पाेलिस प्रशासनासहीत बँक प्रशासन सुद्धा हैराण झाले. इंटरनेट बंद - चालूमुळे दिवसभरातून पीकविमा भरण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू हाेती.

पावसाचा बेपत्ता व प्रशासनाच्या नियाेजनाअभावी कामकाजामुळे शेतकरीवर्गात आक्राेश हाेत आहे. हणेगाव येथील बँकेत पीक विमा स्वीकारण्यास चालू झाल्यानंतर गुरुवारी (ता. २७) या भागातील असंख्य शेतकऱ्यांनी बँक उघडण्यापूर्वीच बँकेसमाेर माेठी गर्दी केली हाेती. महाराष्ट्र ग्रामीण बँक हे बसस्थानकाजवळ मुख्य रस्त्यावर असल्याने अनेकवेळा रस्ता बंद झाला हाेता. याच बराेबर मध्यवर्ती बँकेत इंटरनेट बंद झाल्याने बँकेचे शाखाधिकारी जुक्कलकर यांनी पीक विमा स्वीकारण्यास नकार देवून बँक बंद करून बँकेच्या आवारात थांबले हाेते.

या बाबीचा गावातील काही कार्यकर्त्यांनी हणेगाव बसस्थानक येथे रास्ता राेकाे करून आवाज उठविला. याची पाेलिस प्रशासनाने दखल घेवून बँक प्रशासनाला पीक विमा भरून घेण्याची व्यवस्था करावी, असे सांगितल्यानंतर तणाव दूर झाला. मध्यवर्ती बँकेचे साॅफ्टवेअर पूर्णपणे बंद असल्याने अखेर ऑफ लाईन पीक विमा भरून घेण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरीवर्गाची माेठी गर्दी झाली हाेती. बँकेमार्फत कुपन वाटप करण्यात आले हाेते. कुपनचे नंबर मागे- पुढे व पीक विमा भरून घेण्याची प्रक्रियेला बराच वेळ लागत असल्याने शेतकरीवर्गात आक्राेश व्यक्त हाेत हाेता. या मुळे बँक प्रशासन व पाेलिस प्रशासन यांना तारेवरची कसरत करत कामकाज करावे लागले. दाेन दिवसांच्या कालावधीत जवळपास ५०० शेतकऱ्यांचे विमा उतरविण्यात आला असल्याचे सांगितले. या वेळी पाेलिस उपनिरीक्षक अशाेक माळी, जमादार कनकवळे, मडगूलवार, वाघमारे, ॲड. प्रीतम देशमुख, विवेक पडकंठवार, प्रवीण इनामदार, दशरथ माेरे, तानाजी ठावरे, सुनील पाटील यांनी पीक विमा प्रक्रियेला सहकार्य केले.